होड्या दूर निघाल्या

अनिमिष नयनांच्या कृष्ण-कडा दाटल्या
यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या ॥ध्रू॥

तम विभोरतराच्या अंती
जिथे नदी सागरा भेटी
टाकून मागूती नाती
राखेत अग्नीच्या उष्मा साऱ्या लोपल्या
यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या॥१॥

दूर क्षितीजाची दारे
भासती परकी सारे
मलयाचलाचे ही वारे
दाहती कुमुदकाया आर्त शिणलेल्या
यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या॥२॥

भक्कम पूर्वीचे भाव-तट
साश्रू नयनांनी ओलावत
नावा तरी पुढेच जात
करत व्यथित दशदिशा मावळल्या
यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या॥३॥

- निखिल बिरमल-डागर 

Comments

Popular posts from this blog

मुक्या कळीला फुटले हासू....