स्वयंसूक्त

सूर्य तो प्रचण्ड तप्त शांत चंद्रिकाही मी

मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निकाही मी ॥ध्रू॥


पृथ्वी-तेज-आप-अग्नि मीच व्याप्त व्योमनी

शर-पशु-निषाद बनुनी हिंडतो मी काननी

सृजन-तपन-विलय कर्मी तृतीय नेत्रिका ही मी

मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥१॥


मी बनुनी शंकराच्या करी त्रिशुल तिष्ठलो

मीच गदा-शंख-चक्र हरीमय जाहलो

श्रीप्रिया अधरधरा मुक्त सानिका ही मी

मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥२॥


सृजनाचा आरम्भ मीच मीच ब्राह्मी कामिनी 

कणाकणात स्पंदणाऱ्या प्रदीप्त मीच गर्भिणी 

थाप मी मृदंगाची धूंद नृत्यकर्मी मी

मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥३॥


ताण्डवात तप्तलेली त्यागमूर्ती शोणिता

शाम्भवी ही मीच तो सुरम्य रम्य शाश्वता

भोक्ता-भोज्य-भोज्यदा, क्षुधा भोजनात मी

मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥४॥



Comments

Popular posts from this blog

मुक्या कळीला फुटले हासू....