क्षीर सांडले आहे

रंगमहाली बंदिस्त माझे प्राण कोंडले आहे
बाहेर तिकडे चंद्रानेही क्षीर सांडले आहे

कधी सकाळी वारा सारा देह स्पर्शुनी जातो
कुठे पलिकडे झुरता झुरता तारा निखळुन पडतो
लुकलुकणा-या गोड तारका उगाच हसवुन जाती
तिमिराचे हे तेज पाहूनी नयन भरुनी येती
जाई-जुईचे रंगीत गंधित परस हरवले आहे
बाहेर तिकडे चंद्रानेही क्षीर सांडले आहे

- निखिल बिरमल

Comments

Popular posts from this blog

मुक्या कळीला फुटले हासू....